बातम्या
स्वातंत्र्य दिनी श्रेयस हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन...
By nisha patil - 8/16/2025 2:33:40 PM
Share This News:
स्वातंत्र्य दिनी श्रेयस हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन...
३० रक्तदात्यांकडून संकलित रक्त गरजू रुग्णांसाठी उपलब्ध
श्रेयस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि संजीवन ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाचे अवचित्य साधून दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिरामध्ये जवळपास 30 रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले. या उपक्रमात तरुण, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला.
रक्तदान केल्याने अनेकांचे जीव वाचू शकतात, या सामाजिक जाणीवेने प्रेरित होऊन नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान केले. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. शिबिर यशस्वी करण्यासाठी डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व स्वयंसेवकांनी विशेष मेहनत घेतली.
रक्तदान शिबिरातून संकलित झालेले रक्त स्थानिक रक्तपेढीकडे जमा करण्यात आले असून ते गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिले जाईल. आयोजकांनी सर्व रक्तदात्यांचे मनःपूर्वक आभार मानले....
स्वातंत्र्य दिनी श्रेयस हॉस्पिटलतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन...
|