शैक्षणिक
श्री आदर्श विद्यालय, कोल्हापूर. प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वाटप सोहळा उत्साहात साजरा
By nisha patil - 6/17/2025 9:27:03 PM
Share This News:
श्री आदर्श विद्यालय, कोल्हापूर. प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वाटप सोहळा उत्साहात साजरा
कोल्हापूर (ता. १६ जून २०२५) — हनुमान एज्युकेशन संचलित, श्री आदर्श विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा स्वागतसोहळा व मोफत पाठ्यपुस्तक वाटप समारंभ उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत व प्रार्थनेने झाली.यांनतर सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत करण्यात आले.यानंतर मा. श्री उदय जोशी सर व मा. श्री. दिपक जोशी सर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.
या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. मेघा ठकार मॅडम यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती दिली.
शाळेच्या परिसरात फुलांच्या माळा, रांगोळ्या व फुगे, तकते यांच्या साहाय्याने आकर्षक सजावट करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना गोड खाऊ वाटप करून शाळा प्रारंभाचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
या कार्यक्रमास सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी,अनेक पालक, अनेक रिक्षामामा उपस्थित होते अशाप्रकारे शाळेचा आजचा पहिला दिवस उत्साहात पार पडला
श्री आदर्श विद्यालय, कोल्हापूर. प्रवेशोत्सव आणि पाठ्यपुस्तक वाटप सोहळा उत्साहात साजरा
|