बातम्या
कोडोलीत श्री बाळूमामा मंदिर वर्धापनदिन महोत्सव; आमदार डॉ. विनय कोरे यांची उपस्थिती
By nisha patil - 4/26/2025 2:45:41 PM
Share This News:
कोडोलीत श्री बाळूमामा मंदिर वर्धापनदिन महोत्सव; आमदार डॉ. विनय कोरे यांची उपस्थिती
कोडोली (ता. पन्हाळा) येथील श्री बाळूमामा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त श्री सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र प्रसंगी आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांनी उपस्थित राहून श्री सद्गुरु बाळूमामांचे मनोभावे दर्शन घेतले.
या वेळी श्री सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संभाजी भानुसे, उपाध्यक्ष शिवाजी उचगावकर, खजिनदार शिवाजी हराळे, रामचंद्र आष्टेकर, आनंदा अनुसे, कृष्णात वाकसे, नामदेव बादरे, मारुती वाघमोडे, प्रकाश दुर्गोडे यांच्यासह अनेक मान्यवर आणि भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत भक्तिमय वातावरणात झाले असून, महाप्रसादाने सर्व भाविकांना प्रसन्नता लाभली.
कोडोलीत श्री बाळूमामा मंदिर वर्धापनदिन महोत्सव; आमदार डॉ. विनय कोरे यांची उपस्थिती
|