बातम्या

गोरंबेत श्री भावेश्वरी मंदिर वास्तुशांती सोहळ्याला सुरुवात; तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

Shri Bhaveshwari Temple Vastu Shanti Celebration begins in Goramba


By Administrator - 3/14/2026 1:19:21 PM
Share This News:



गोरंबेत श्री भावेश्वरी मंदिर वास्तुशांती सोहळ्याला सुरुवात; तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

गोरंबे येथे ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीच्या नव्या मंदिराच्या वास्तुशांती सोहळ्याच्या आनंदोत्सवाला आज शनिवार (दि. १४) पासून उत्साहात सुरुवात झाली. हा सोहळा सोमवार (दि. १६) पर्यंत तीन दिवस विविध धार्मिक व अध्यात्मिक कार्यक्रमांनी रंगणार आहे.

ग्रामस्थांच्या सहभागातून सुमारे अडीच कोटी रुपये खर्चून शिल्पकलेतील आखीव-रेखीव आणि भव्य असे ग्रामदैवत श्री भावेश्वरी देवीचे मंदिर उभारण्यात आले आहे. या मंदिरातील नवीन पाषाणमूर्तीचे आज दिंडी मिरवणुकीद्वारे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या मिरवणुकीत लेझीम पथक, भजनी मंडळांचा गजर, तसेच “श्री भावेश्वरीच्या नावानं चांगभलं” च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भर उन्हाच्या तडाख्यातही हजारो ग्रामस्थ, माहेरवाशिणी तसेच पै-पाहुणे मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते.

रविवार (दि. १५) रोजी सकाळी आंबील-घुगऱ्यासह गारवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून दुपारपासून मंत्रपठन होणार आहे. सोमवार (दि. १६) रोजी सकाळी ९ वाजता कलशारोहण व वास्तुशांती सोहळ्यानंतर मंदिराचे लोकार्पण होणार असून दिवसभर महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे.

ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे गोरंबे गावात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे


गोरंबेत श्री भावेश्वरी मंदिर वास्तुशांती सोहळ्याला सुरुवात; तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
Total Views: 11