बातम्या

श्री लक्ष्मी पतसंस्था दत्तवाडची २१ वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना १०% लाभांश जाहीर!

Shri Laxmi Patsanstha


By nisha patil - 12/9/2026 9:07:39 PM
Share This News:



श्री लक्ष्मी पतसंस्था दत्तवाडची २१ वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना १०% लाभांश जाहीर!
 

एन.पी.ए. शून्य टक्के तर संस्थेला सलग ‘अ’ ऑडिट वर्ग.... 
 

​दत्तवाड (प्रतिनिधी):आचिन हेरवाडे..  येथील ‘श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित, दत्तवाड’ (ता. शिरोळ) या संस्थेची २१ वी वार्षिक अधिमंडळ सर्वसाधारण सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेच्या उत्तम आर्थिक नियोजनामुळे आणि पारदर्शक कारभारामुळे चालू वर्षात सभासदांना १०% लाभांश (डिव्हिडंड) देण्याची शिफारस करण्यात आली असून संस्थेने शून्य टक्के (०.००%) एन.पी.ए. आणि ‘अ’ ऑडिट वर्ग टिकवून ठेवत सहकार क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
 

सभेचे उद्घाटन व दीपप्रज्वलन संस्थेचे संचालक, सभासद  शांशिकात जोशी,आजित वठारे ,.यांच्या हस्ते करण्यात आले. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मा. श्री. बबन आदिशा चौगुले हे होते, तर स्वागत व प्रास्ताविक व्हाईस चेअरमन मा. श्री. चंद्रशेखर यशवंतराव मोहिते यांनी केले. सभेच्या सुरुवातीला संस्थेचे संचालक मा. श्री. सक्काण्णा सुरचंद सिदनाळे यांनी श्रद्धांजलीचा ठराव मांडला.
​संस्थेची उत्कृष्ट आर्थिक स्थिती (वर्ष २०२५-२६):
​एकूण सभासद संख्या: ८५५
​वसूल भागभांडवल: ₹४०,४२,०००/-
​खेळते भांडवल: ₹१०,३३,२६,६१६.७३
​एकूण ठेवी: ₹७,३९,६२,७२६.२८
​कर्ज वाटप: ₹५,९९,३४,४९८/-
​कर्ज वसुली प्रमाण: ९६.५५%
​गुंतवणूक: ₹४,०३,६९,४९५/-
​निव्वळ नफा: ₹७,९३,२१३.५६
​एन.पी.ए. (NPA): ०.००% (शून्य टक्के)
​ऑडिट वर्ग: ‘अ’ (A Grade)
​गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा सत्कार:
या वार्षिक सभेप्रसंगी संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सत्कार करण्यात आला. यामध्ये:
​इयत्ता १० वी: प्रथम - कु. अभिषेक राजगौडा पाटील (९३.८०%), द्वितीय - कु. दर्शन बाहुबली नेज्रे (९२.८०%), तृतीय - कु. जान्हवी अमित हेमगिरे (९२.२०%). (तसेच सिद्धांत पाटील, श्रावणी पाटील, ऋतिका अथणे, स्वाती देवमोरे, तपस्या सांवता सिदनाळे व स्वरदा धोतोरे यांचा उत्तेजनार्थ सत्कार करण्यात आला.)

 

​इयत्ता १२ वी (सायन्स): प्रथम - कु. प्रेरणा विजय निर्मळे (८६.३४% / JEE Main ९६.५२%tile).
​याशिवाय, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेले मान्यवर, पत्रकार, सर्व संचालक व सल्लागार मंडळाचा विशेष सत्कार करण्यात आला.

 

​कार्यक्रमाचे विषयपत्रिका वाचन मॅनेजर यांनी केले. संस्थेची उत्तरोत्तर प्रगती सभासद व कर्जदारांच्या विश्वासामुळेच शक्य झाल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
​सभेच्या शेवटी संचालक मा. श्री. सूर्यकांत चौगुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सभेस संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्री लक्ष्मी पतसंस्था दत्तवाडची २१ वी वार्षिक सभा उत्साहात; सभासदांना १०% लाभांश जाहीर!
Total Views: 15