शैक्षणिक

विवेकानंद  कॉलेजमध्ये  श्री. राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवा  गौरव  संपन्न

Shri Rajendra Salunkhes service to Vivekananda College is rich in glory


By nisha patil - 4/29/2026 3:21:30 PM
Share This News:



विवेकानंद  कॉलेजमध्ये  श्री. राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवा  गौरव  संपन्न

येथील विवेकानंद कॉलेजमधील श्री राजेंद्र साळुंखे,  हे 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले.  या निमित्ताने त्यांचा प्रशासकीय स्टाफच्या वतीने प्रमुख पाहुणे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी मा. श्री कौस्तुभ गावडे व कोल्हापूर विभागप्रमुख डॉ. श्रीराम साळुंखे यांच्या हस्ते मानपत्र, शाल श्रीफळ, पोशाख देऊन सत्कार करण्यात आला.  

कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून झाली. प्रास्ताविक व स्वागत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेचे अध्यक्ष श्री हितेंद्र साळुंखे यांनी केले. मानपत्राचे वाचन श्री अमित साळुंखे यांनी केले.  याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहुणे मा. कौस्तुभ गावडे म्हणाले, विवेकानंद संस्थेतील सर्व गुरुदेव कार्यकर्ते हे एक कुटुंब आहे व आपण सर्वजण बापूजींचे वैचारिक वारसदार आहोत.  सेवा बजावत असताना कामावर निष्ठा ठेवून काम करा म्हणजे असा सेवागौरव होतो व प्रामाणिकपणाच्या सेवेचे फळ मिळते.  त्यांनी केलेल्या प्रामाणिक सेवेचा आदर्श इतरांनीही घ्यावा.

डॉ. श्रीराम साळुंखे म्हणाले, कुटुंबातील अबाधित ठेवणारे व्यक्तिमत्व म्हणजे राजेंद्र साळुंखे. त्यांनी दोन पिढ्यांमधील जिव्हाळा जपला.  समाजात बापूजींच्या कार्याचा सन्मान वाढवण्याचे काम त्यांनी केले आहे . यावेळी प्रा. प्रकाश साळुंखे, भरत कवठेकर, राजकुमार देसाई, प्रतीक साळुंखे, अनिल पवार, डॉ. नीता पाटील , प्रा.सौ मनीषा साळुंखे यांनी मनोगते मांडली.    

सत्काराला उत्तर देताना राजेंद्र साळुंखे म्हणाले, या विवेकानंद शिक्षण संस्थेमुळे माझे जीवन घडले मला सामाजिक मान सन्मान मिळाला, माझे कुटुंब स्वावलंबी झाले,  त्याबद्दल मी या संस्थेचा आजन्म ऋणी राहीन.

 अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सी बी पाटील यांनी सेवानिवृत्ती हा भावनिक क्षण असल्याचे सांगून त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या आरोग्यदायी व सुखी समाधानी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.  आभार श्री बबन करपे यांनी मांनले,  तर सूत्रसंचालन श्री अमर जाधव यांनी केले.  या कार्यक्रमास सर्व प्रशासकीय कर्मचारी, प्राध्यापक, नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विवेकानंद  कॉलेजमध्ये  श्री. राजेंद्र साळुंखे  यांचा  सेवा  गौरव  संपन्न
Total Views: 5