बातम्या
कोल्हापुरात 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
By Administrator - 3/25/2026 4:25:35 PM
Share This News:
कोल्हापुरात 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
मिरजकर तिकटी येथे तीन दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल; शनिवारी महाप्रसादाचे आयोजन
कोल्हापूर: येथील मंगलवार पेठ, मिरजकर तिकटी येथे 'हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूर'च्या वतीने सन २०२६ चा 'श्री रामनवमी उत्सव' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. गुरुवार, २६ मार्च ते शनिवार, २८ मार्च या कालावधीत हा उत्सव होणार असून, यामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.
कार्यक्रमांचे नियोजन:
उत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दि. २६ मार्च रोजी सकाळी १० वाजता प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाने आणि पाळणा सोहळ्याने होईल. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता इस्कॉन मंदिर यांच्या वतीने भक्तीमय भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होईल.
शुक्रवार, दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ७ रामरक्षा पठण आयोजित करण्यात आले आहेत. उत्सवाची सांगता शनिवार, दि. २८ मार्च रोजी होणार असून सकाळी ११ वाजता सर्व भाविकांसाठी भव्य 'महाप्रसादाचे' आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांना आवाहन: मिरजकर तिकटी येथील या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याला सर्व रामभक्तांनी आणि कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, तसेच शनिवारी आयोजित महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदू एकता आंदोलन, कोल्हापूरच्या वतीने करण्यात आले आहे.
या रामनवमी उत्सवाचे नियोजन दिपक देसाई, हिंदूराव शेळके, विलास मोहिते, वैभव कवडे, अनिकेत पवार, शिवाजी चिले व इतर कार्यकर्ते यांनी केले आहे.
कोल्हापुरात 'हिंदू एकता आंदोलन'तर्फे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन
|