शैक्षणिक
विवेकानंद कॉलेजमध्ये श्री शिवाजी माने यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न
By nisha patil - 5/31/2025 3:14:51 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये श्री शिवाजी माने यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न
कोल्हापूर: 31 : माणसे जोडण्याचे काम व विद्यार्थ्याना मदत करण्याची सेवाभावी वृत्ती शिवाजी माने यांच्यामध्ये आहे.
सेवाभाव माणसाला घडवीत असतो. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी संस्था स्थापनेच्या माध्यमातून सुसंस्कारी व ज्ञानी विद्यार्थी घडविले. सेवाभाव आणि मानवतावादी मूल्यांच्या रुजवणुकीसाठी त्यांनी समर्पणाची वृत्ती गुरुदेव कार्यकर्त्यांत निर्माण केली. त्यामुळेच असे अनेक गुरुदेव कार्यकर्ते निर्माण झाले. त्यांना मी भावी आरोग्यपूर्ण आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. असे प्रतिपादन विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांनी केले. ते श्री. शिवाजी माने यांच्या सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभाच्या अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमापूजनाने व संस्था प्रार्थनेने झाली. यावेळी शिवाजी माने, प्रयोगशाळा परिचर यांचा महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या हस्ते मानपत्र, शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना श्री शिवाजी माने यांनी शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे व संस्थेप्रती ऋणभाव व्यक्त केला व श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेच्या मुळेच माझे आयुष्य् घडले. असे मत मांडले.
याप्रसंगी भालचंद्र माने, प्रा. डी.बी.पुजारी, आर व्ही सदाफुले यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी मानपत्राचे वाचन अधीक्षकसंजय दळवी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्य्क ग्रंथपाल व प्रशासकीय कर्मचारी प्रतिनिधी . हितेंद्र साळुंखे यांनी केले. आभार बी.आर.करपे यांनी मानले . सुत्रसंचालन . अमर जाधव यांनी केले. या प्रसंगी प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व नातेवाईक उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये श्री शिवाजी माने यांचा सेवानिवृत्ती सदिच्छा समारंभ संपन्न
|