ताज्या बातम्या
श्री स्वामी समर्थ पालखी–पादुका दर्शन. सोहळ्याचे भव्य आयोजन"
By nisha patil - 9/1/2026 2:33:50 PM
Share This News:
शेंडूर | प्रतिनिधी अजित बोडके
“॥ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे ॥” या आश्वासक मंत्राच्या गजरात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट यांच्या वतीने शेंडूर परिसरात श्री स्वामी समर्थ पालखी व पादुका दर्शन तसेच महाआरती सोहळ्याचे भक्तिभावपूर्ण आयोजन करण्यात आले आहे.
हा पवित्र सोहळा शुक्रवार दि. ९ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १२.०० वाजता पार पडले असून कै. विजय आण्णा पोवार यांच्या निवासस्थानी स्वामींच्या पालखीचे आगमन झाले. यावेळी महाआरती, पालखी–पादुका दर्शन व प्रसाद वितरण झाले असून सर्व स्वामी भक्तांनी या दिव्य सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन निमंत्रक सौ. व श्री संजय उर्फ प्रभाकर विजय पोवार यांनी केले होते
असून धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक एकतेचे दर्शन घडणार आहे.
श्री स्वामी समर्थ पालखी–पादुका दर्शन. सोहळ्याचे भव्य आयोजन"
|