बातम्या
बसवेश्वर जयंतीनिमित्त उत्साहात "श्री" पालखी सोहळा; किशोर पाटील कुटुंबाला मानाचा मान, स्वप्निलदादा आवडे यांची उपस्थिती
By nisha patil - 1/5/2025 5:27:32 PM
Share This News:
बसवेश्वर जयंतीनिमित्त उत्साहात "श्री" पालखी सोहळा; किशोर पाटील कुटुंबाला मानाचा मान, स्वप्निलदादा आवडे यांची उपस्थिती
इचलकरंजी, दि. १ मे – जगदगुरू महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त उत्साहात "श्री" पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिरसात न्हालेल्या वातावरणात आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला.
या वर्षीच्या पालखी सोहळ्यात किशोर पाटील व त्यांच्या कुटुंबीयांना मानाचा मान देण्यात आला. बसवेश्वरांच्या प्रतिमेची विधिपूर्वक पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.
पालखी मिरवणुकीत क. आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवडे यांनी विशेष उपस्थिती नोंदवत समाज बांधव व भाविकांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी वीरशैव उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष गजानन सुलतापुरे, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रकाश दत्तवाडे, नंदू पाटील, बँकेचे संचालक श्रीशैल कित्तुरे, युवराज माळी, अमित गाताडे, निंगराज कित्तुरे, शार्दुल शेटे, कालगोंडा पाटील, सुशांत मुरदुंडे, श्रीकांत पाटील, अॅड. बी. ए. देसाई, चंद्रकांत माळी, महादेव कुंभार, सोमनाथ पाटील, शिवम पाटील, रवींद्र माळकर, सुभाष पाटील यांच्यासह इतर मान्यवर, समाज बांधव आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण शहरात धार्मिकतेचे आणि सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण करणारा हा सोहळा यशस्वीपणे पार पडल्याबद्दल आयोजकांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
बसवेश्वर जयंतीनिमित्त उत्साहात "श्री" पालखी सोहळा; किशोर पाटील कुटुंबाला मानाचा मान, स्वप्निलदादा आवडे यांची उपस्थिती
|