शैक्षणिक
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मध्ये समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
By nisha patil - 7/24/2025 3:23:42 PM
Share This News:
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मध्ये समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
कोल्हापूर: दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागात समाज संवाद समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन नुकतेच झाले.
या निमित्ताने युवक मंथन आणि समाज चिंतन या विषयावर सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय मुरगूड मधील समाजशास्त्र विभागातील सहयोगी प्राध्यापक पांडुरंग सारंग यांनी मार्गदर्शन केले .शहाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के.एम.देसाई यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पी पी भाटे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. व्ही. व्ही. कुरणे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमास आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. डी. मांडणीकर, सहसमन्वयक डॉ. ए. बी. बलुगडे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. डी. के. वळवी, प्रबंधक आर.जे.भोसले, अधीक्षक एम.व्ही भोसले, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमास शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांचे प्रोत्साहन मिळाले.
श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात मध्ये समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे उद्घाटन
|