बातम्या
श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
By nisha patil - 9/7/2025 8:59:44 PM
Share This News:
श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
इचलकरंजी, दि. ९ जुलै —श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त, श्री नामदेव समाज सेवा मंडळ इचलकरंजी यांच्या वतीने यंदाही विविध आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
गेली ३५ वर्षे या उपक्रमाच्या माध्यमातून इचलकरंजी व परिसरातील विद्यार्थ्यांना मंच मिळवून देण्याचे कार्य या मंडळामार्फत सातत्याने केले जात आहे.
या वर्षीच्या स्पर्धांचे उद्घाटन क. आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
या कार्यक्रमाला श्री संत नामदेव समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरुणकर, बँकेचे संचालक श्रीशैले कित्तुरे, श्री संत नामदेव युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर, तसेच स्वरूप कुडाळकर व नारायण काकडे यांच्यासह इतर मान्यवर, समाजबांधव आणि स्पर्धक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुणांना वाव मिळतो, तसेच संत नामदेव महाराजांच्या विचारांचा प्रसार होतो,
श्री संत नामदेव महाराजांच्या ६७५ व्या समाधी महोत्सवानिमित्त आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन
|