शैक्षणिक
श्रीपतराव बोंद्रे दादा जयंती महोत्सवास शहाजी महाविद्यालयात प्रारंभ विजयराव बोंद्रे बापू यांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
By nisha patil - 12/16/2025 1:29:51 PM
Share This News:
कोल्हापूर: महाराष्ट्राचे माजी कृषी राज्यमंत्री स्वर्गीय श्रीपतराव शंकरराव बोंद्रे (दादा )जयंती महोत्सवास आज श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेतील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात प्रारंभ झाला.यानिमित्ताने आज पहिल्या दिवशी स्वच्छता मोहीम , वृक्षारोपण झाले.तसेच संस्थेचे माजी मानद सचिव स्वर्गीय विजयराव श्रीपतराव बोंद्रे( बापू) यांच्या तिसऱ्या पुण्यतिथी दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले,अधीक्षक मनीष भोसले यांनी विजयराव बापूंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण यांनी श्रीपतराव बोंद्रे दादा, विजयराव बोंद्रे बापू यांच्या आठवणींना यावेळी उजाळा दिला.त्यांचे विचार आजही प्रेरणादायी आणि आदर्श असे आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले. दादांच्या जयंती महोत्सवानिमित्त त्यांचे विचार अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या पर्यंत समाजापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
स्वागत व प्रस्ताविक ग्रंथपाल डॉ. पांडुरंग पाटील यांनी केले. आभार डॉ. शिवाजी रायजादे यांनी मानले. आय क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर,सह समन्वयक डॉ.ए.बी.बलुगडे,डॉ.डी.के.वळवी, प्रा. पी. के. पाटील यांनी संयोजन केले. सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
महाविद्यालयातील एनएसएस व एनसीसी विभागाच्या वतीने महाविद्यालय व संस्था परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. तसेच वडाच्या झाडाचे आणि चिकूच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. डॉ. विजय देठे, डॉ. प्रशांत पाटील प्रा. एस.एच.कांबळे यांनी संयोजन केले.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. या जयंती महोत्सवांतर्गत आरोग्य तपासणी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शहाजी वार्तां अंकाचे प्रकाशन, प्रश्नमंजुषा स्पर्धा, विद्यार्थी विद्यार्थिनीची आरोग्य तपासणी, रस्सीखेच स्पर्धा, ग्रंथ प्रदर्शन,भिंती पत्रक प्रदर्शन, हस्ताक्षर स्पर्धा , चित्रकला स्पर्धा, ऊस तोडणी कामगारांना कपडे वाटप ,कॅरम, बुद्धिबळ स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रक्तदान शिबीर, श्रीपतराव बोंद्रे दादा यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन ,शहाजी वार्ता विशेष अंकाचे प्रकाशन ,डॉ.ए.बी.बलुगडे यांचे दादांना आठवताना याविषयावर व्याख्यान, तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे 16 डिसेंबर ते 28 डिसेंबर पर्यंत हा जयंती महोत्सव चालणार आहे .या महोत्सवात विविध 22 कार्यक्रम ,उपक्रमांचे आयोजन केले आहे.
श्रीपतराव बोंद्रे दादा जयंती महोत्सवास शहाजी महाविद्यालयात प्रारंभ विजयराव बोंद्रे बापू यांना पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन
|