राजकीय

श्रीरंग खवरे व बाळासाहेब माने यांची भाजपा मंडल अध्यक्षपदी निवड; प्रकाशआण्णा व डॉ. राहुल आवाडेंकडून शुभेच्छा भेट

Shrirang Khaware and Balasaheb Mane

By nisha patil - 12/7/2025 3:19:38 PM
Share This News:

श्रीरंग खवरे व बाळासाहेब माने यांची भाजपा मंडल अध्यक्षपदी निवड; प्रकाशआण्णा व डॉ. राहुल आवाडेंकडून शुभेच्छा भेट

इचलकरंजी | प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहरात नव्या संघटनात्मक नियुक्त्या करण्यात आल्या असून, शहर पूर्व मंडल अध्यक्षपदी श्रीरंग खवरे तर ग्रामीण मंडल अध्यक्षपदी बाळासाहेब माने यांची निवड करण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर माजी मंत्री व आमदार मा. प्रकाशआण्णा आवाडे तसेच आमदार डॉ. राहुल आवाडे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी विशेष भेट घेतली. या प्रसंगी दोन्ही आमदारांनी श्री. खवरे आणि श्री. माने यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

नवीन जबाबदाऱ्या स्वीकारताना पक्ष संघटन अधिक बळकट व्हावे आणि कार्यात यश मिळावे, अशी अपेक्षा दोन्ही आमदारांनी व्यक्त केली. या भेटीमुळे इचलकरंजी भाजपामध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरंग खवरे व बाळासाहेब माने यांची भाजपा मंडल अध्यक्षपदी निवड; प्रकाशआण्णा व डॉ. राहुल आवाडेंकडून शुभेच्छा भेट
Total Views: 69