बातम्या

खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र विजेता; शुभम मकोटेच्या कामगिरीने उजळला विजय

Shubham mkote

By nisha patil - 5/20/2025 7:19:46 PM
Share This News:

खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र विजेता; शुभम मकोटेच्या कामगिरीने उजळला विजय

इचलकरंजी, २० मे – खेलो इंडिया खो-खो स्पर्धेच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्र संघाने शानदार विजय मिळवत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

या विजयी संघात इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांचे वर्गमित्र प्रमोद मकोटे यांचे चिरंजीव शुभम मकोटे निवड झालेली होती.
शुभमने संपूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

त्याच्या या यशाबद्दल स्वप्निलदादा आवाडे यांनी त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी यशवंत प्रोसेसचे संचालक राजू भिसे, प्रमोद मकोटे, आयको स्पिनिंग मिलचे एम.डी. अस्लम कोतवाल, शेखर नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. शुभमच्या या घवघवीत यशामुळे इचलकरंजी शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

खेलो इंडिया खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र विजेता; शुभम मकोटेच्या कामगिरीने उजळला विजय
Total Views: 143