बातम्या
सिद्धी संदीप जाधव हिची खेलो इंडिया ट्रायबल गेम्स साठी पंच पदी निवड
By Administrator - 3/30/2026 3:51:37 PM
Share This News:
सिद्धी संदीप जाधव हिची खेलो इंडिया ट्रायबल गेम्स साठी पंच पदी निवड
दिनांक 25/03/2026 ते 01/0412026 अखेर रायपुर छत्तीसगढ येथे संपन्न होत असलेल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कुमारी सिद्धी संदीप जाधव हिचे हॉकी या क्रीडा प्रकारासाठी पंच म्हणून निवड झाली आहे.
सिद्धी हिला हॉकी महाराष्ट्र चे अध्यक्ष कृष्णप्रकाश (आयपीएस) तसेच हॉकी इंडियाचे असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट मनोज भोरे, मनीष आनंद, दिग्विजय नाईक हॉकी कोल्हापूरचे पदाधिकारी मोहन भांडवले,सुरेखा पाटील,संताजी भोसले,ताहीर शेख,धीरज पाटील,सागर जाधव, मार्गदर्शक संतोष चौगुले, राहुल गावडे व इतर सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सिद्धी जाधव हिला खासदार धैर्यशील माने यांचे वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य लाभत आहे.
सिद्धी संदीप जाधव हिची खेलो इंडिया ट्रायबल गेम्स साठी पंच पदी निवड
|