विशेष बातम्या
‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती!
By nisha patil - 6/13/2025 9:47:42 PM
Share This News:
‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती!
साल २०२५-२६ मध्ये २८० मेट्रिक टन गाय तुपाचा पुरवठा – गोकुळचा गौरव
कोल्हापूर (ता. १३ जून) – कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. (गोकुळ) संघाला मुंबईच्या श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्टकडून वर्ष २०२५-२६ साठी २८० मेट्रिक टन गाय तुपाचा पुरवठा करण्याची प्रतिष्ठेची ऑर्डर सलग दुसऱ्या वर्षी मिळाली आहे.
गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथून मुंबईकडे जाणाऱ्या पहिल्या १० मेट्रिक टन तुपाच्या वाहनाचे पूजन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माजी चेअरमन विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक मंडळ व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, “गोकुळने गुणवत्तेला नेहमी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. गोकुळच्या तुपाचा सात्विक दर्जा व नैसर्गिक सुवास यामुळेच सिद्धिविनायक ट्रस्टने आमच्यावर विश्वास ठेवत दुसऱ्यांदा संधी दिली. ही ऑर्डर म्हणजे आमच्या लाखो शेतकऱ्यांच्या कष्टांना मिळालेलं प्रमाणपत्र आहे.”
२०२४-२५ मध्ये गोकुळने २५० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा केला होता. या वर्षी ऑर्डर ३० मेट्रिक टनांनी वाढली असून दरमहा सरासरी २४ मेट्रिक टन तूप मुंबईला पाठविले जाणार आहे.
‘गोकुळ’च्या तुपाला पुन्हा सिद्धिविनायक मंदिराची पसंती!
|