राजकीय

सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर प्रचारसभेला उदंड प्रतिसाद

Sidhanerli


By nisha patil - 1/29/2026 10:45:56 PM
Share This News:



सिद्धनेर्ली प्रचार सभा......

सौ. सुयशा घाटगे राज्यात मताधिक्यांचा विक्रम करतील

 मंत्री हसन मुश्रीफ यांचा विश्वास

सौ. सुवर्णा पाटील देशात आदर्श सुनबाई ठरतील

सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर प्रचारसभेला उदंड प्रतिसाद

सिद्धनेर्ली, दि. २९: सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुयशा अमरिषसिंह घाटगे प्रचंड मताधिक्यांचा राज्यात विक्रम नोंदवतील, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. वडिलांप्रमाणेच सासर्‍याची काळजी घेणाऱ्या सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदार संघाच्या उमेदवार सौ. सुवर्णा शशिकांत पाटील सबंध देशात आदर्श सुनबाई ठरतील, असेही ते म्हणाले.

 सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सुयशा अमरिषसिंह घाटगे, सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुवर्ण शशिकांत पाटील व साके पंचायत मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रय रावण दंडवते यांच्या प्रचारार्थ सिद्धनेली ता. कागल येथे जाहीर प्रचार सभेत मंत्री  मुश्रीफ बोलत होते. 

 मंत्री  मुश्रीफ पुढे म्हणाले की, वडिलांप्रमाणेच सासऱ्यांची काळजी घेणाऱ्या सौ. सुवर्णा पाटील या आदर्श सुनबाई आहेत. तसेच; संजयबाबा घाटगे यांच्या संघर्षमय वाटचालीत त्यांच्या सुनबाई सौ. सुयशा घाटगे यांनी त्यांना चांगली साथ दिली. या दोघींच्या सेवाभावाची, संस्कारांची व कर्तव्यनिष्ठेची दखल समाजाने घ्यावी, असेही त्यांनी नमूद केले.

या वेळी शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, “तालुक्याचा सर्वांगीण विकास हे आमचे प्रमुख ध्येय आहे. सौ. सुयशा घाटगे व सौ. सुवर्णा पाटील या दोघीही लोकसेवेला समर्पित असलेल्या सक्षम उमेदवार असून त्यांना जनतेचा भरघोस पाठिंबा मिळेल, याची आम्हाला खात्री आहे.”

गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे यांनीही उमेदवारांच्या कार्याचा गौरव करत विकासाच्या दिशेने ठोस पावले उचलण्याचा विश्वास व्यक्त केला. 

व्यासपीठावर माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        

शाहू साखर कारखान्याचे संचालक प्रा. सुनील मगदूम, विजय काळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

         

व्यासपीठावर अन्नपूर्णाचे संचालक एम. बी पाटील, शाहूचे संचालक डी. एस. पाटील, राजे बँकेचे संचालक राघू हजारे, कृष्णात मेटील, वाय. व्ही. पाटील, राहुल मगदूम, सरपंच सौ. अनुराधा पाटील, अमर कांबळे, दिलीप कडवे, शाहू कृषीचे अध्यक्ष रामा वैराट, नेताजी मोरे आदी उपस्थित होते. 

         सरपंच दत्तात्रय पाटील यांनी स्वागत केले. विलास पवार यांनी आभार मानले.

*देशात आदर्श सुनबाई…!*

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, सिद्धनेर्ली पंचायत समिती मतदारसंघाच्या उमेदवार सौ. सुवर्णा शशिकांत पाटील या डाव्या विचारांचे ज्येष्ठ नेते स्व. गणपती नाना पाटील यांच्या सुनबाई आहेत. कै. श्री. पाटील यांचे आठवड्यापूर्वी १०९ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. संपूर्ण आयुष्यात त्यांनी सासऱ्यांची वडिलांप्रमाणे सेवा केली. भाकरी-दुधात कुस्करून त्यांना जेवण भरवणे, त्यांची काळजी घेणे या सेवाभावामुळे सौ. सुवर्णा पाटील या संपूर्ण देशात आदर्श सुनबाई ठरतील.

*सिद्धनेर्ली ता. कागल येथे राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीच्या जिल्हा परिषद व पंचायत समिती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे. समोर मोठ्या संख्येने उपस्थित नागरिक.*

 


सिद्धनेर्ली जिल्हा परिषद मतदार संघाच्या जाहीर प्रचारसभेला उदंड प्रतिसाद
Total Views: 16