बातम्या
सिंधुदुर्गातील वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर ओरोसमध्ये जिल्हास्तरीय वीज परिषद....
By nisha patil - 6/28/2026 10:25:57 PM
Share This News:
सिंधुदुर्गातील वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर ओरोसमध्ये जिल्हास्तरीय वीज परिषद....
सिंधुदुर्ग :✒️गवस शुभम.जिल्ह्यातील सुमारे ३.६३ लाख वीज ग्राहकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेने केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संघटनेने जिल्हास्तरीय वीज परिषद आयोजित करण्याची मागणी केली.
या मागणीची दखल घेत श्रीपाद नाईक यांनी २६ जुलैपूर्वी ओरोस येथे जिल्हास्तरीय वीज परिषदेचे आयोजन करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. परिषदेला केंद्रीय व राज्य ऊर्जा राज्यमंत्री तसेच महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संघटनेने निवेदनाद्वारे वारंवार होणारे वीज खंडित होणे, पावसाळ्यापूर्वी देखभाल-दुरुस्तीची अपुरी कामे, स्मार्ट मीटरबाबतच्या तक्रारी, ग्राहकांना CPL उपलब्ध करून देणे, नुकसानभरपाईची अंमलबजावणी, ग्राहक सुविधा केंद्रे सुरू करणे आणि तक्रार निवारण व्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या मागण्या केल्या आहेत.
या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड. नंदन वेंगुर्लेकर, सचिव साईनाथ आंबेकर, तसेच वेंगुर्ला तालुका संघटनेचे अध्यक्ष संजय गावडे व सचिव जयराम वायंगणकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या प्रलंबित प्रश्नांवर या परिषदेत ठोस निर्णय होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गातील वीज ग्राहकांच्या प्रश्नांवर ओरोसमध्ये जिल्हास्तरीय वीज परिषद....
|