बातम्या

सिद्धी देसाई हिची एमपीएससीतून राज्य कर निरीक्षक पदावर निवड

Sidhii desai


By nisha patil - 9/17/2025 11:34:22 PM
Share This News:



सिद्धी देसाई हिची एमपीएससीतून राज्य कर निरीक्षक पदावर निवड

आजरा (हसन तकीलदार): सुलगाव (ता. आजरा) येथील कु. सिद्धी अनिल देसाई हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या मुख्य परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश संपादन करून राज्य कर निरीक्षक (वर्ग-२) पदावर झेप घेतली आहे.

 

सिद्धीचे प्राथमिक शिक्षण सुलगाव शाळेत, माध्यमिक शिक्षण व्यंकटराव हायस्कूल आजरा येथे झाले. तिने गडहिंग्लज येथील साधना ज्युनिअर कॉलेजमधून पुढील शिक्षण घेतले आणि शासकीय महाविद्यालय कराड येथून बी.फार्मसीची पदवी मिळवली. शिक्षण काळात अनेक शिष्यवृत्त्या मिळवत तिने आपले शैक्षणिक पाय भक्कम केले.

 

कराड येथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिद्धीने आपल्या गावातच एमपीएससीचा अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच प्रयत्नात राज्य कर निरीक्षक पद मिळवले. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

 

आपल्या यशाचे श्रेय सिद्धीने आई-वडील, काका, प्राथमिक-माध्यमिक शिक्षक, महाविद्यालयीन प्राध्यापक, स्वामी विवेकानंद क्लासेस मुरगूड, झेप अकॅडमी आजरा तसेच गंगामाई वाचनमंदिरातील मार्गदर्शकांना दिले आहे.

 

 

 


सिद्धी देसाई हिची एमपीएससीतून राज्य कर निरीक्षक पदावर निवड
Total Views: 57