विशेष बातम्या
पाच वर्षांनी टिकटॉकचे 'रिएंट्री' संकेत!
By nisha patil - 8/23/2025 4:31:50 PM
Share This News:
पाच वर्षांनी टिकटॉकचे 'रिएंट्री' संकेत!
वापरकर्त्यांसाठी वेबसाइट सुरू, अॅप मात्र अजूनही गायब
भारतामध्ये पाच वर्षांपूर्वी बंदी घालण्यात आलेले लोकप्रिय शॉर्ट व्हिडिओ अॅप टिकटॉक पुन्हा परतण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वापरकर्त्यांसाठी टिकटॉकची अधिकृत वेबसाइट पुन्हा सुरू झाली असून अनेकांनी ती वापरण्यास सुरुवातही केली आहे. मात्र, सध्या तरी हे अॅप गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल अॅप स्टोअरवर उपलब्ध झालेले नाही.
जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षानंतर केंद्र सरकारने टिकटॉकसह शेकडो चिनी अॅप्सवर बंदी घातली होती. त्यानंतर भारतीय वापरकर्त्यांना या अॅपचा वापर करण्यास मज्जाव करण्यात आला होता.आता पुन्हा एकदा वेबसाइट सुरू झाल्याने टिकटॉक भारतात 'रिएंट्री'च्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, अधिकृत स्तरावर केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया अद्याप देण्यात आलेली नाही.
पाच वर्षांनी टिकटॉकचे 'रिएंट्री' संकेत!
|