बातम्या
जिल्ह्यात "रेशीम विभाग आपल्या दारी" अभियान सुरू
By nisha patil - 4/9/2025 3:58:29 PM
Share This News:
जिल्ह्यात "रेशीम विभाग आपल्या दारी" अभियान सुरू
१ ते ३० सप्टेंबरदरम्यान शेतकऱ्यांशी संवाद, तुती लागवडीला चालना
कोल्हापूर, दि. 4 : कोल्हापूर जिल्हा रेशीम कार्यालयाकडून "रेशीम विभाग आपल्या दारी" अभियान १ ते ३० सप्टेंबरदरम्यान राबवले जात आहे. दोन वर्षांपूर्वी नोंदणी करूनही तुती लागवड न केलेल्या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन रेशीम उद्योगाबाबत मार्गदर्शन व अभिप्राय घेण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करवीर तालुक्यातील बेले गावातून झाला.
रेशीम विकास अधिकारी राजेश कांबळे यांनी सांगितले की, मनरेगा अंतर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना एका एकरासाठी तीन वर्षांत एकूण ₹4.32 लाखांचा लाभ मिळतो. तर बहुभूधारक शेतकऱ्यांसाठी "सिल्क समग्र 2" या केंद्र पुरस्कृत योजनेत सहभाग घेता येतो.
मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार राज्यात ४ कोटी तुती वृक्ष लागवडीचे लक्ष्य असून त्यापैकी १४ लाख वृक्ष लागवड कोल्हापूर जिल्ह्यात केली जाणार आहे. शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून पर्यावरणपूरक शेतीसह उत्पन्न वाढवावे, असे आवाहन करण्यात आले.
जिल्ह्यात "रेशीम विभाग आपल्या दारी" अभियान सुरू
|