विशेष बातम्या

शहरामध्ये विविध ठिकाणच्या चॅनलमधून सहाशे ते सातशे किलो प्लॅस्टिक बॉटल व इतर कचरा उठाव

Six hundred to seven hundred kilos


By nisha patil - 5/26/2025 11:12:15 PM
Share This News:



शहरामध्ये विविध ठिकाणच्या चॅनलमधून सहाशे ते सातशे किलो प्लॅस्टिक बॉटल व इतर कचरा उठाव
 
कोल्हापूर ता.26 : शहरातील विविध ठिकाणच्या चॅनलमधून आज आरोग्य विभागाच्यावतीने सहाशे ते सातशे किलो प्लॅस्टीक बॉटल व इतर कचरा सफाई कर्मचारी मार्फत चॅनेलमधून काढण्यात आला. प्रशासक के.मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली नालेसफाईची मोहिम राबविण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत आज कसबा बावडा येथील भगवा चौक येथील अख्खा मसूर हॉटेल जवळील चॅनल, व्हीनस कॉर्नर, कल्याण ज्वेलर्स, दुधाळी, राजारामपुरी व लक्ष्मीपुरी येथील चॅनलची सफाई करण्यात आली. या चॅनलध्ये प्लॅस्टीक पाण्याच्या बाटल्या व कचरा मोठया प्रमाणात साठला होता. महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या सहाय्याने हे चॅनल साफ करुन प्लॅस्टीक, पाण्याच्या बाटल्या व इतर कचरा काढण्यात आला. महापालिकेने गेले चार ते पाच दिवस नाल्यांच्या सफाईमध्ये सातत्य ठेवले आहे. त्यामुळे यावेळी कोणत्याही नागरीकांच्या घरी वळवाच्या पावसाचे पाणी शिरलेले नाही. 
    

दरम्यान महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे यांनी यल्लमा मंदिर जवळील पोकलॅन्ड मशिनच्या सहाय्याने करण्यात येत असलेल्या नाले सफाईच्या कामाची दुपारी पाहणी केली. यावेळी सहा.आयुक्त कृष्णा पाटील उपस्थित होते.


शहरामध्ये विविध ठिकाणच्या चॅनलमधून सहाशे ते सातशे किलो प्लॅस्टिक बॉटल व इतर कचरा उठाव
Total Views: 172