बातम्या
महाराष्ट्र राज्य 19 वर्षाखालील फुटबॉल संघात कोल्हापुरातील सहा खेळाडूंची निवड
By nisha patil - 1/10/2025 4:56:41 PM
Share This News:
महाराष्ट्र राज्य 19 वर्षाखालील फुटबॉल संघात कोल्हापुरातील सहा खेळाडूंची निवड
आजरेकर फाउंडेशनतर्फे खेळाडूंचा सत्कार
कोल्हापूर : जम्मू-कश्मीर येथे होणाऱ्या १९ वर्षाखालील राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात कोल्हापुरातील सहा खेळाडूंची निवड झाली आहे. या यशाबद्दल आजरेकर फाउंडेशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
निवड झालेल्या खेळाडूंमध्ये मुस्तफा फरास, स्मित पार्टे, प्रतीक गायकवाड, विराज पाटील, मयूर सुतार आणि अविराज पाटील यांचा समावेश आहे. हे सर्वजण महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर कॉलेज संघाचे खेळाडू असून त्यांना क्रीडा शिक्षक प्रदीप साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
सत्कार समारंभ प्रसंगी उद्योगपती तेज घाटगे, समर जाधव, स्वप्निल पार्टे, सुलतान फरास (काका), राजू भाई नदाफ आणि अशपाक आजरेकर उपस्थित होते.
राष्ट्रीय फुटबॉलपटू आश्किन आजरेकर यांच्या वतीने खेळाडूंना सन्मानचिन्ह आणि ट्रॅक सूट प्रदान करण्यात आले. यावेळी खेळाडूंना भावी वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या.
महाराष्ट्र राज्य 19 वर्षाखालील फुटबॉल संघात कोल्हापुरातील सहा खेळाडूंची निवड
|