बातम्या
बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात सहावी अटक; एजंट सागर पाटील SIT च्या जाळ्यात!
By nisha patil - 7/10/2026 11:17:42 PM
Share This News:
बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात सहावी अटक; एजंट सागर पाटील SIT च्या जाळ्यात!
आदमापूर येथील संत बाळूमामा देवस्थान ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. शेतकऱ्यांकडून अवघ्या २० लाख रुपयांना जमीन खरेदी करून ती ट्रस्टला कोट्यवधी रुपयांना विकल्याचा आरोप असलेला एजंट सागर सर्जेराव पाटील याला मंगळवारी अटक करण्यात आली.
सागर पाटील हा या प्रकरणातील सहावा संशयित एजंट आहे. यापूर्वी पाच एजंटांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टमधील मेंढ्या-बकऱ्यांची विक्री तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा तपास सध्या एसआयटीकडून सुरू आहे.
तपासातून या कथित गैरव्यवहाराची रक्कम सुमारे ६० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीतील व्यवहारांची चौकशी सुरू आहे. काही जमीन व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रे तयार करून त्यांचा वापर केल्याचे आणि नोंदींमध्ये अनियमितता केल्याचे आरोप आहेत. दरम्यान, सागर पाटीलला बुधवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
बाळूमामा ट्रस्ट जमीन गैरव्यवहारात सहावी अटक; एजंट सागर पाटील SIT च्या जाळ्यात!
|