बातम्या
‘स्मार्ट बझर’ ने महिलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान शक्य
By nisha patil - 9/10/2025 4:50:49 PM
Share This News:
‘स्मार्ट बझर’ ने महिलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान शक्य
डी. वाय. पाटील विद्यापीठातील संशोधकांनी महिलांमध्ये अंडाशयाचा कर्करोग प्रारंभिक टप्प्यात ओळखण्यासाठी एआय-आधारित ‘स्मार्ट बझर’ तयार केले आहे. कार्बन क्वांटम डॉट्स आणि बायोसिग्नल विश्लेषणाच्या सहाय्याने हे उपकरण काही सेकंदांत संभाव्य कर्करोगाचे संकेत शोधते.
.%5B1%5D.jpg)
मोबाईल अॅपशी जोडता येणारे हे साधन पारंपरिक रक्त तपासण्या तुलनेत अधिक वेगवान, संवेदनशील आणि परवडणारे आहे. संशोधक प्रा. अर्पिता तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे उपकरण विकसित केले असून, उद्योग सहकार्य आणि क्लिनिकल ट्रायल्सही सुरू आहेत.
.jpg)
उपकरणामुळे ग्रामीण भागातील महिलांनाही सुलभ आणि किफायतशीर निदान सुविधा मिळणार आहेत, ज्यामुळे कर्करोगाचे प्रारंभिक उपचार शक्य होतील आणि मृत्यूदरात घट होण्यास मदत होईल.
.%5B2%5D.jpg)
कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि विद्यापीठाने संशोधकांचे अभिनंदन केले
‘स्मार्ट बझर’ ने महिलांमध्ये कर्करोगाचे लवकर निदान शक्य
|