बातम्या

स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटरची बिल वसुली थांबवावी 

Smart meter bill collection should


By nisha patil - 6/16/2025 10:18:03 PM
Share This News:



स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटरची बिल वसुली थांबवावी 
 

दोन आठवड्यापूर्वी महावितरण कार्यालय कुरुंदवाड या ठिकाणी सर्वपक्षीय स्मार्ट मीटर विरोधी समितीकडून हे आंदोलन केलं होतं त्यामध्ये स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय वरिष्ठांना कळवू व निर्णय झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करणार नाही असे लेखी आश्वासन दिले होते .
 

असे असताना सुद्धा आज टाकवडे शिरढोण येथे जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवलेल्या ग्राहकांची विज बिल भरले नाही म्हणून कनेक्शन तोडली जात होती सक्तीने वीजबिल वसुली चालू होती त्या ठिकाणी आंदोलन अंकुश च्या कार्यकर्त्यांनी वसुली थांबवून जोपर्यंत स्मार्ट मीटरचा निर्णय होत नाही तोपर्यंत वसुली करू नये आणि तोडलेली स्मार्ट मीटर कनेक्शन तात्काळ जोडावीत तसेच जुनी मीटर बसवावेत यासाठी  ठिय्या आंदोलन करण्यात आले .
 

यावेळी आंदोलन अंकुश संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील ,विश्वास बालीघाटे नागेश काळे ,प्रभाकर बंडगर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनाच्या ठिकाणी कुरुंदवाड सब डिव्हिजनचे अधिकारी श्री मंदरे यांनी स्मार्ट मीटर ची कनेक्शन तोडलेले आहेत जोडली जातील व उद्या मंगळवार दुपारी 4 वाजता जयसिंगपूर सब डिव्हिजन या ठिकाणी स्मार्ट मीटर रद्द करणे बसवलेल्या ठिकाणी जुनी मीटर बदलून देणे या मागण्याबाबत बैठक घेण्याचे ठरले. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील ,शिरढोणचे सरपंच भास्कर कुंभार ,सुकुमार खिलारे , अनिल हुपरीकर, शिवाजी काळे ,सुलाबाई सासणे, मुमताज तहसीलदार ,माधुरी शिंदे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महिलावर्ग तसेच शेतकरी उपस्थित होते.


स्मार्ट मीटर रद्दचा निर्णय होत नाही तोपर्यंत स्मार्ट मीटरची बिल वसुली थांबवावी 
Total Views: 193