बातम्या

स्मार्ट वीज मिटर विरोधात शिवसेना उबाठा तर्फे बोंब मारो आंदोलन

Smart miter


By nisha patil - 12/6/2026 8:44:28 PM
Share This News:



**स्मार्ट वीज मिटर विरोधात शिवसेना उबाठा तर्फे बोंब मारो आंदोलन*

 **आजरा(हसन तकीलदार)*:-आजरा महावितरण कंपनीचे कर्मचारी आजरा शहरातील व तालुक्यातील नागरिकांची कोणतीही मागणी नसताना बळजबरीने तसेच घरात कोणीही नसताना दिशाभूल करून त्याचप्रमाणे रिडींगला माणसे येणार नाहीत त्यामुळे तुम्हाला अंदाजे बिल म्हणून जादा बिल येणार, यानंतर मागणी केलातरी मिटर मिळणार नाही अशी भीती दाखवून स्मार्ट मिटर बसवत असलेच्या लोकांच्या तक्रारी आल्याने याअगोदर अनेकवेळा शिवसेनेने आंदोलने केली होती त्यावेळी अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने मीटर बसवणार नाही असे आश्वासन दिले होते.

तरीसुद्धा महावितरणचे कंत्राटी कर्मचारी स्मार्ट वीज मिटर आता बसवत आहेत. याच्या निषेधार्थ शिवसेना उबाठाच्या वतीने आज बोंबमारो आंदोलन करून महावितरण कार्यालयाच्या समोर निदर्शने करण्यात आली.

   मनमानी कारभार करणाऱ्या, स्मार्ट मीटर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांचा, ग्राहकांच्यावर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो, स्मार्ट मीटर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावाने... ठो. ठो. ठो. बोंब मारण्यात आली. याबरोबरच खेडेगावातील गंजलेले विजखांब बदला, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करा. इ. मागण्या करण्यात आल्या.

 यावेळी संभाजी पाटील, युवराज पोवार, दिनेश कांबळे, दयानंद भोपळे, समिरभाई चांद, बिलाल लतीफ, प्रभाकर कोरवी, संजय येसादे, हरिश्चंद्र व्हराकटे, सुयश पाटील, सागर नाईक, महेश पाटील, अमित गुरव, इम्तियाज माणगावकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


स्मार्ट वीज मिटर विरोधात शिवसेना उबाठा तर्फे बोंब मारो आंदोलन
Total Views: 253