बातम्या

पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघात स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना मताधिक्य देणार; नाथाजी पाटील 

Smita Jadhav and Kaustubh Gawde to secure a lead in the Graduate and Teachers


By nisha patil - 10/10/2026 3:21:33 PM
Share This News:



पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघात स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना मताधिक्य देणार; नाथाजी पाटील 

पुणे पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता देवी जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जीवाचे रान करतील, असा विश्वास भाजपचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केला. भाजपच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी मंडलाध्यक्ष आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. मतदार नोंदणी चांगल्या पद्धतीने झाल्याचा दावा करत, दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी प्रत्येक तालुक्यात मतदार संपर्काची जबाबदारी प्रमुख कार्यकर्त्यांवर सोपवण्यात आली.

या बैठकीला जिल्हा सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव, महेश चौगुले, सुशीला पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कोल्हापूर ग्रामीण जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.


पदवीधर अन् शिक्षक मतदारसंघात स्मिता जाधव, कौस्तुभ गावडेंना मताधिक्य देणार; नाथाजी पाटील 
Total Views: 11