बातम्या

तर राहुल पाटील व चंद्रदीप नरके मित्र असतील...

So Rahul Patil and Chandradeep Narake will be friends


By nisha patil - 8/23/2025 4:32:45 PM
Share This News:



तर राहुल पाटील व चंद्रदीप नरके मित्र असतील...

 राहुल व राजेश पाटलांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश... पक्षाला मिळाले हत्तीचे बळ

राहुल पाटील आणि राजेश पाटील या बंधूंनी गेल्या महिनाभरात तालुका दौरे करून कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या दोघांसह त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हत्तीचे बळ मिळणार आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत या शक्तीची सरशी होऊन युतीचा झेंडा फडकवण्यास मोठा हातभार लागेल, असा विश्वास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात तीन जागा वाढणार असल्याचे संकेत देत जर मतदारसंघाची विभागणी झाली, तर पुढील काळात राहुल पाटील आणि चंद्रदीप नरके हे मित्र म्हणून एकत्र राहतील, असं भास्य देखील मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले


तर राहुल पाटील व चंद्रदीप नरके मित्र असतील...
Total Views: 61