बातम्या
तर... ३० एप्रिल रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन
By nisha patil - 4/29/2025 5:17:39 PM
Share This News:
तर... ३० एप्रिल रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभेत निर्धार
कोल्हापूर महापालिकेच्या परवाना विभागाने व्यवसाय परवाना फीमध्ये केलेली दरवाढ अन्यायकारक असून ती तात्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा ३० एप्रिल रोजी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन छेडण्याचा निर्णय कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभेत घेण्यात आला.
अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले की, ३० मार्च रोजी प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले होते व ३ एप्रिल रोजी अधिकाऱ्यांशी बैठक होऊन दरवाढीविरोधात स्पष्ट भूमिका मांडण्यात आली होती. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने उद्या होणाऱ्या उपसमितीच्या बैठकीत निर्णय न झाल्यास आंदोलन अपरिहार्य ठरेल.
उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, मानद सचिव अजित कोठारी यांनी महापालिकेच्या हलगर्जीविरोधात संताप व्यक्त केला. २२ एप्रिल रोजी पत्र पाठवून मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती, मात्र लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलनाची तयारी करण्यात येत आहे. सभेत विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
तर... ३० एप्रिल रोजी महानगरपालिकेसमोर ठिय्या आंदोलन
|