शैक्षणिक
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
By nisha patil - 9/9/2025 10:43:30 AM
Share This News:
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
धोकादायक खडी हटवून रस्ता केला अपघातमुक्त
कोल्हापूर :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अपघाताचा धोका ओळखून कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या एनएसएस विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
जिल्हा सत्र न्यायालयाजवळील गंगा भाग्योदय हॉल परिसरात खड्डे बुजवण्यासाठी टाकलेली खडी वाहतुकीस अडथळा ठरत होती. या खडीमुळे अनेक दुचाकी घसरून अपघात झाले होते. ही धोकादायक खडी हटवण्यासाठी विद्यार्थ्यांनी बावडा रेस्क्यू फोर्स आणि राजाराम बंधारा ग्रुप यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवली.
या मोहिमेत मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते सहभागी झाले. अपघाताचा धोका दूर करून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित करण्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रयत्नाचे परिसरातील नागरिक व वकील बांधवांकडून कौतुक करण्यात आले. सामाजिक जाणीवेची भावना जोपासणाऱ्या या उपक्रमामुळे युवकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे.
डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची सामाजिक बांधिलकी
|