बातम्या
गणेशोत्सवाच्या वर्गणीतून सामाजिक बांधिलकी; बावडा स्मशानभूमीस साहित्यदान
By nisha patil - 5/10/2026 4:35:19 PM
Share This News:
गणेशोत्सवाच्या वर्गणीतून सामाजिक बांधिलकी; बावडा स्मशानभूमीस साहित्यदान
कोल्हापूर : जावडेकर रेसिडेन्सी, वागळे मळा येथील छत्रपती शिवराय मित्र मंडळातर्फे यंदाचा गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी काही कारणास्तव महाप्रसादाचे आयोजन न करता, गणेशोत्सवासाठी जमा झालेल्या वर्गणीतून शिल्लक राहिलेली रक्कम सामाजिक उपक्रमासाठी वापरण्यात आली.
मंडळातर्फे बावडा स्मशानभूमीस दोन राक्षविसर्जन पात्र (ट्रे) आणि १२ सुपल्या यांसह आवश्यक साहित्य दान करण्यात आले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या मंडळाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
मंडळाचे अध्यक्ष अमित जाधव, उपाध्यक्ष सुजित जाधव तसेच योगेंद्र केंबळकर, जयदीप जाधव, अमोल जाधव, संदीप शेवडे, प्रकाश ताटे, विशाल वाघ, धैर्यशील जाधव, अमोल माडीकर, अमेय पाटील, आनंदराव जाधव, राहुल शेलार, मनोहर पाटील, चेतन पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गणेशोत्सवाच्या वर्गणीतून सामाजिक बांधिलकी; बावडा स्मशानभूमीस साहित्यदान
|