बातम्या

मानवी मूल्ये आणि नैतिकतेच्या माध्यमातूनच समाजाची प्रगती – लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांचे प्रतिपादन

Society progresses only through human


By nisha patil - 1/9/2025 5:46:45 PM
Share This News:



मानवी मूल्ये आणि नैतिकतेच्या माध्यमातूनच समाजाची प्रगती – लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांचे प्रतिपादन

पिंपरी,  : “मानवी मूल्ये आणि नैतिकता हीच राष्ट्र व समाजाच्या प्रगतीची खरी पायाभरणी आहे,” असे प्रतिपादन आर्म्ड फोर्स मेडिकल सर्व्हिसेसचे महासंचालक लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांनी केले. ते डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या २० व्या स्थापना दिन सोहळ्यात बोलत होते.

कार्यक्रमात कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सीए. मिलिंद काळे यांना “डॉ. डी. वाय. पाटील जीवन गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. या पुरस्कारातील एक लाख रुपये व स्वतःकडील एक लाख रुपये असे दोन लाख रुपये ते डी. वाय. पाटील कृषी विद्यापीठातील संशोधनासाठी देणार असल्याची घोषणा काळे यांनी केली.

स्थापना दिनाच्या निमित्ताने सकाळी ध्वजारोहण व विद्यापीठ गीतानंतर मुख्य सोहळा हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात पार पडला. कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

ले. जनरल गोयल म्हणाले, “विद्यार्थी हीच देशाची खरी ताकद आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत उत्तम संस्कार मिळाल्यास युवक कर्तृत्ववान होतील आणि भारत महासत्ता बनेल. हेच कार्य डी. वाय. पाटील विद्यापीठ सातत्याने करत आहे.”

डॉ. संजय डी. पाटील यांनी सांगितले की, विद्यापीठाला NAAC A++QS I-Gauge Diamond मानांकन मिळाले असून, जागतिक दर्जाच्या विद्यापीठांच्या श्रेणीत स्थान मिळवणे हे पुढील ध्येय आहे.

सीए. मिलिंद काळे यांनी “हा सन्मान ही जबाबदारी वाढवणारी थाप आहे” असे सांगत, डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला.

या सोहळ्यात प्राध्यापक, विद्यार्थी, विविध संस्थांचे प्रमुख, अधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मानवी मूल्ये आणि नैतिकतेच्या माध्यमातूनच समाजाची प्रगती – लेफ्टनंट जनरल भूपेश के. गोयल यांचे प्रतिपादन
Total Views: 58