बातम्या

हातकणंगलेत सांडपाणी आणि पाणीपुरवठा समस्येवर उपाय

Solutions to wastewater and water supply problems in Hatkanangale


By nisha patil - 7/25/2025 3:29:24 PM
Share This News:



हातकणंगलेत सांडपाणी आणि पाणीपुरवठा समस्येवर उपाय

 आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या हस्ते ३० लाखांच्या कामाचे उद्घाटन

हातकणंगले गावातील तलाव परिसरात सांडपाणी मिसळल्याने नागरिकांना आरोग्याच्या समस्या भेडसावत होत्या. या पार्श्वभूमीवर नगरसेवक अभिजीत लुगडे यांच्या पुढाकाराने आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्याकडे पाठपुरावा करून गटार व ड्रेनेज पाणीपुरवठा योजनेसाठी ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. याचा उद्घाटन सोहळा आमदार डॉ. आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कामामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळणार असून, अनेक आरोग्य समस्या मार्गी लागतील. स्थानिक नागरिकांनी यावेळी हातकणंगले बायपास रस्त्यासाठीही मागणी केली.

उपस्थित मान्यवर: माजी जि.प. सदस्य अरुण इंगवले, नगरसेवक अभिजीत लुगडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल पाटील, भाजप शहरप्रमुख अमर इंगवले, आकाश टोणे, सिकंदर बोरगावे, संदीप कांबळे, आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.


हातकणंगलेत सांडपाणी आणि पाणीपुरवठा समस्येवर उपाय
Total Views: 58