बातम्या

पुष्पनगरच्या सोनमची जपानमध्ये पदकाला गवसणी; गावाचा अभिमान उंचावला!

Sonam from Pushpanagar clinches a medal in Japan


By nisha patil - 9/28/2026 1:48:12 PM
Share This News:



पुष्पनगरच्या सोनमची जपानमध्ये पदकाला गवसणी; गावाचा अभिमान उंचावला!

पुष्पनगर (प्रतिनिधी, ओमकार सावंत) : पुष्पनगरची सुकन्या कु. सोनम उत्तम मस्कर (किल्लेदार) हिने जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात रौप्य पदक पटकावून गावाचा नावलौकिक आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविला आहे. तिच्या या यशामुळे पुष्पनगरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर सोनमने मिळविलेल्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. तिच्या कामगिरीने गावातील युवा खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळाली आहे.
 

या यशाबद्दल शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रसाद पिलारे, युवा उद्योजक अतुल अण्णा कल्याणकर, अमोल कल्याणकर, जयवंतराव चोरगे, राजेंद्र देसाई, धनाजी सावंत, सरपंच वैशाली संतोष शिंदे, उपसरपंच साधना संभाजी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य विक्रम दत्तात्रय खाडे, निलेश देसाई, प्रल्हाद देसाई, अमित शिंदे, अतुल शिंदे, तानाजी राऊत, राजेंद्र पवार, अशोक माडेकर, धनाजी डांगे, माजी सरपंच धनाजी राऊत यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी आणि समस्त ग्रामस्थांनी सोनमचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 

पुष्पनगरच्या या कन्येने मिळविलेले रौप्य पदक संपूर्ण गावासाठी अभिमानाची बाब ठरले असून, तिच्या पुढील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा व्यक्त होत आहेत.
 


पुष्पनगरच्या सोनमची जपानमध्ये पदकाला गवसणी; गावाचा अभिमान उंचावला!
Total Views: 14