बातम्या
विश्वाच्या रहस्यांचा वेध घेण्यासाठी अवकाश संशोधन गरजेचे – डॉ. सचिन पन्हाळकर
By nisha patil - 9/26/2025 2:52:22 PM
Share This News:
विश्वाच्या रहस्यांचा वेध घेण्यासाठी अवकाश संशोधन गरजेचे – डॉ. सचिन पन्हाळकर
कोल्हापूर, दि. 25 : “मानवाने प्राचीन काळापासून विश्वाचे रहस्य जाणून घेण्यासाठी सतत प्रयत्न केले आहेत. मात्र खऱ्या अर्थाने अवकाश संशोधनाची सुरुवात 20व्या शतकात झाली. अवकाशाचा अभ्यास विश्वाच्या रहस्यांचा उलगडा करण्यासाठी अत्यावश्यक आहे,” असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे भूगोल विभागप्रमुख डॉ. सचिन पन्हाळकर यांनी केले.
ते विवेकानंद कॉलेजच्या भूगोल विभागाच्या वतीने ‘अवकाश दिना’निमित्त आयोजित पोस्टर व मॉडेल प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी त्यांनी सांगितले की, 1954 मध्ये रशियाने अवकाश संशोधनाची सुरुवात केली तर 1969 मध्ये अमेरिकेने मानवाला चंद्रावर पाठवले. भारतानेही डॉ. विक्रम साराभाई यांच्या दूरदृष्टीमुळे या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली असून, एकाच वेळी 104 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण करण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. चांद्र आणि मंगळ मोहिमेद्वारे भारताने जगाला लो-कॉस्ट अवकाश तंत्रज्ञानाची ताकद दाखवून दिली आहे. उपग्रह तंत्रज्ञानामुळे दळणवळण, शिक्षण, कृषी, संरक्षण, तसेच भूस्खलन, महापूर यांसारख्या आपत्ती व्यवस्थापनात मोठी मदत होत आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. एस. पी. थोरात यांनी भूषविले. प्रास्ताविक प्रा. डॉ. जी. एस. उबाळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. व्ही. एम. पाटील यांनी करून दिला तर आभारप्रदर्शन डॉ. एच. पी. पाटील यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. निशा सुर्वे यांनी केले.
या प्रसंगी डॉ. वैशाली पालकर, डॉ. सिद्धार्थ घोडेराव, प्रा. अश्विनी मुरावणे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोस्टर व मॉडेल स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
विश्वाच्या रहस्यांचा वेध घेण्यासाठी अवकाश संशोधन गरजेचे – डॉ. सचिन पन्हाळकर
|