बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘स्पंदन कलाप्रदर्शन 2026’ चे उदघाटन उत्साहात संपन्न
By nisha patil - 9/7/2026 6:35:35 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘स्पंदन कलाप्रदर्शन 2026’ चे उदघाटन उत्साहात संपन्न
कोल्हापूर दि.9 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर (अधिकारप्रदत्त स्वायत्त) च्या बी.व्होक. विभागामार्फत ग्राफिक डिझाईन, ॲनिमेशन ॲण्ड फिल्म् मेकींग आणि फोटोग्राफी व व्हिडीओग्राफी विद्यार्थ्यांच्या वर्षभरातील कलाकृतींचे स्पंदन कलाप्रदर्शन 2026 च्या उदघाटन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी त्यांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बी.व्होक.सारख्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारे कौशल्याधारित अभ्यासक्रमांची आवश्यकता आहे. प्रत्येकामध्ये ईश्वरदत्त् एखादी कला असते, त्या कलेचा छंद जोपासता आला पाहिजे. सात स्वर, सात रंग आयुष्याला सुंदर बनवित असतात. आवड जोपासल्यास आयुष्य आनंदी होईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कलेचा गुण हेरुन त्या कलेसाठी प्रोत्साहित केले पाहिजे. कलाक्षेत्रामध्ये आज रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. असे प्रतिपादन केले. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, श्रीमती ए.आर.पाटील कन्या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ श्रुती जोशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, प्रा.डॉ. सी. बी. पाटील, महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. एस. आर. कट्टीमनी व बी.व्होक विभागाचे डीन डॉ. ए. एस. महात इ. मान्यवर उपस्थित होते.
कलाप्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे डिन डॉ.ए.एस.महात, प्रा.राहुल इंगवले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. प्रास्ताविक व स्वागत प्रा.डॉ.सी.बी. पाटील यांनी केले. आभार प्रा.मंगेश खोले यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया पाटील यांनी केले.
सदरचे प्रदर्शन दि. 09, 10 व 11 जुलै 2026 असे तीन दिवस असून या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी केलेली फोटोग्राफी, पेंटिग्ज, ग्राफिक डिझाईन, व्हिडीओग्राफी, ॲनिमेशन ॲण्ड फिल्म मेकींग , हस्तकला वस्तू , इन्स्टॉलेशन यांचा समावेश आहे. या प्रदर्शनाचा लाभ विद्यार्थी, पालक, जाहिरात संस्था, व्यावसायिक संस्था, कला रसिक यांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्रबंधक श्री.एस.के.धनवडे, प्रा.महेश माळी, प्रा.रविराज सुतार, प्रा अभिजीत माने, प्रा.मंगेश खोले, प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.
विवेकानंद कॉलेजमध्ये ‘स्पंदन कलाप्रदर्शन 2026’ चे उदघाटन उत्साहात संपन्न
|