बातम्या

इचलकरंजीच्या अटल महोत्सवात लाडक्या बहिणींसाठी विशेष ऑफर

Special offer for beloved sisters at Ichalkaranji's Atal Mahotsav


By nisha patil - 10/9/2025 1:35:05 PM
Share This News:



इचलकरंजी :- इचलकरंजी शहरातील अटल महोत्सवात आजपासून महिलांसाठी आणि नागरिकांसाठी खास ऑफरची सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते करण्यात आले.

मंगळवार व बुधवार या दोन दिवसांकरिता महोत्सवात लहान–मोठे सर्व पाळणे फक्त 30 रुपयांत उपलब्ध होणार आहेत. एवढेच नव्हे तर पुरुषांसाठी देखील कोणतेही पाळणे केवळ 30 रुपयांत घेण्याची संधी मिळणार आहे.

महोत्सवात खाऊ गल्लीची सुविधा, स्वतंत्र पार्किंग व्यवस्था तसेच महिला व लहान मुलांसाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी वातावरणाची सोय उपलब्ध होणार आहे.

या विशेष ऑफरमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून "यापेक्षा स्वस्त कुठेच नाही" असा दावा आयोजकांनी केला आहे.
महोत्सवाचे ठिकाण नामदेव मैदान, जिम्नेशियम मैदान जवळ, हत्ती चौक परिसर, कागवाडे मळा, इचलकरंजी येथे आहे.

आयोजकांनी सर्व बचत गट, महिला मंडळ व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऑफरचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.


इचलकरंजीच्या अटल महोत्सवात लाडक्या बहिणींसाठी विशेष ऑफर
Total Views: 47