मनोरंजन

कोल्हापूरमध्ये ‘अरण्य’ चित्रपटाची विशेष भेट

Special presentation of the film Aranya in Kolhapur


By nisha patil - 3/9/2025 5:09:03 PM
Share This News:



कोल्हापूरमध्ये ‘अरण्य’ चित्रपटाची विशेष भेट

आदिवासी भागातील संघर्ष, नक्षलवाद आणि एका वडील-मुलीच्या नात्याची हृदयस्पर्शी कहाणी सांगणारा मराठी चित्रपट ‘अरण्य’ आता कोल्हापूरमध्ये आपल्या प्रमोशनसाठी दाखल झाला आहे. अमोल दिगंबर करंबे लिखित-दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक संदेश देतानाच प्रेक्षकांना भावनिक प्रवास घडवून आणणार आहे.

‘अरण्य’चे निर्माते शरद पाटील आणि अंजली पाटील असून, एस. एस. स्टुडिओज व XPO प्रस्तुत, ADIK Filmsच्या सहकार्याने हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.

चित्रपटात प्रमुख भूमिकेत हार्दिक जोशी झळकतो असून त्याच्यासोबत वीणा जगताप, चेतन चवडा, अमोल खापरे, सुरेश विश्वकर्मा, विजय निकम आणि ह्रितिका पाटील यांच्या दमदार भूमिका प्रेक्षकांच्या मनाला भिडतील.

यापूर्वी चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशित झाले असून, राज्यभर या चित्रपटाची मोठी चर्चा सुरू आहे.


कोल्हापूरमध्ये ‘अरण्य’ चित्रपटाची विशेष भेट
Total Views: 64