राजकीय

मुंबई महापालिका प्रचारासाठी मनसेची अनोखी तयारी; राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाबाहेर खास रेल्वे इंजिन सज्ज

Special train engine ready outside Raj Thackeray Shiv Tirtha


By nisha patil - 12/31/2025 1:53:55 PM
Share This News:



मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचे रणधुमाळी आता रंगू लागणार असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यासाठी वेगळीच तयारी केल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर प्रचारासाठी खास डिझाइन केलेले रेल्वे इंजिन उभे करण्यात आले असून, ते सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या आकर्षक रेल्वे इंजिनच्या पुढील भागात विशेष केबिन तयार करण्यात आली असून, त्यामध्ये प्रचारादरम्यान सहा ते सात जण बसू शकतील अशी सोय करण्यात आली आहे. अवघ्या काही दिवसांत प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होणार असून, मनसेचा हा अभिनव प्रचार प्रकार निवडणूक रणांगणात चर्चेचा विषय ठरत आहे.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली असून, हे खास तयार करण्यात आलेले रेल्वे इंजिन प्रचाराचा महत्त्वाचा भाग ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या माध्यमातून पक्षाचा संदेश अधिक प्रभावीपणे मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


मुंबई महापालिका प्रचारासाठी मनसेची अनोखी तयारी; राज ठाकरे यांच्या शिवतीर्थाबाहेर खास रेल्वे इंजिन सज्ज
Total Views: 16