ताज्या बातम्या
मुंबईहून कोल्हापूरसाठी विशेष रेल्वेसेवा सुरु – पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा
By nisha patil - 2/9/2025 1:27:28 PM
Share This News:
मुंबईहून कोल्हापूरसाठी विशेष रेल्वेसेवा सुरु – पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा
कोल्हापूर (ता.२) :
सणासुदीचा हंगाम म्हणजे प्रवासाची सर्वाधिक गर्दी. गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी अशा सलग सणांच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणात गावाकडे होणारी धावपळ लक्षात घेता, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने खास पाऊल उचलले आहे.
मुंबई–कोल्हापूर या मार्गावर २४ सप्टेंबरपासून विशेष रेल्वेसेवा सुरु करण्यात येत असून, ही सुविधा २६ नोव्हेंबरपर्यंत उपलब्ध राहणार आहे.
📍 गाडीचे वेळापत्रक
कोल्हापूरहून सुटणे : प्रत्येक बुधवारी रात्री १०.०० वा.
मुंबईत आगमन : दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वा.
मुंबईहून सुटणे : प्रत्येक गुरुवारी दुपारी २.३० वा.
कोल्हापूरात आगमन : शुक्रवारी पहाटे ४.२० वा.
या विशेष गाडीला मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला असून, त्यामुळे पुणे, सातारा, सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना याचा मोठा फायदा होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कमी होऊन, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर व सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा आहे.
मुंबईहून कोल्हापूरसाठी विशेष रेल्वेसेवा सुरु – पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना दिलासा
|