विशेष बातम्या
शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत जलतरणपटूंची नेत्रदीपक कामगिरी
By nisha patil - 10/11/2025 5:05:11 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत जलतरणपटूंची नेत्रदीपक कामगिरी
कोल्हापूर, दि. १० नोव्हेंबर: रयत शिक्षण संस्थेचे येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज आणि शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच झालेल्या स्पर्धेत शिवाजी विद्यापीठाच्या जलतरणपटूंनी नेत्रदीपक कामगिरी बजावित राष्ट्रीय स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले.
विद्यापीठाच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आणि बी.ए. (स्पोर्ट्स) विभागाच्या जलतरणपटूंनी आंतरविभागीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यामध्ये धैर्यशील किरण भोसले याने १०० व २०० मीटर फ्री स्टाईल (सुवर्णपदक) ५० मीटर फ्री स्टाईल (रजतपदक) ५० व १०० मीटर बटर फ्लाय आणि २०० मीटर वैयक्तिक मिडले (सुवर्णपदक) अशी कामगिरी केली. तर, मुलींच्या गटात धिरीजा रमेश मोरे हिने ५०, १००, २०० मीटर बॅकस्ट्रोक (सुवर्ण), १००, २०० मीटर फ्री स्टाईल (सुवर्ण), २०० बटर फ्लाय (सुवर्ण) तसेच ५०, १०० मीटर बटरफ्लाय (रजत) आणि अनुष्का सयाजी पाटील हिने ५०, १००, २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक (सुवर्ण) अशी कामगिरी केली.
या तिघांचीही चेन्नई येथे १८ ते २३ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या ऑल इंडिया विद्यापीठ राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.या खेळाडूंना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांचे प्रोत्साहन लाभले, तर क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे आणि डॉ. राजेंद्र रायकर, सुचय खोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय स्पर्धेत जलतरणपटूंची नेत्रदीपक कामगिरी
|