राजकीय

नीयाज असिफ खानांचा प्रचाराचा दमदार शुभारंभ; प्रभाग 13 मध्ये उत्स्फूर्त गर्दी

Spontaneous crowd in Ward 13


By nisha patil - 11/12/2025 1:28:37 PM
Share This News:



 प्रभाग क्रमांक 13 मधील माजी नगरसेवक नीयाज असिफ खान यांनी आज आपल्या निवडणूक प्रचाराचा भव्य शुभारंभ केला. राजर्षी शाहू वसाहत, सुधाकर नगर, यादव नगर, अर्जुन ग्रुप आणि मंगलमूर्ती तरुण मंडळ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रचाराची सुरुवात वार्षिक कॅलेंडर वाटपाने करण्यात आली. यावेळी नीयाज असिफ खान यांनी गेल्या निवडणुकीत दिलेल्या भरघोस मतांबद्दल नागरिकांचे मनापासून आभार मानले.

गेल्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ते पुन्हा एकदा रणांगणात उतरले असल्याचे सांगत,
“मी तुमचा भाऊ, तुमचा मुलगा… पुन्हा एक संधी द्या,” असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.

कार्यक्रमादरम्यान नारळ फोडून, फटाके फोडून आणि आतषबाजी करत प्रचाराचा जल्लोषात शुभारंभ झाला. महिलांनी फेटे बांधून सहभाग नोंदवल्याने वातावरण अधिक रंगतदार झाले.


नीयाज असिफ खानांचा प्रचाराचा दमदार शुभारंभ; प्रभाग 13 मध्ये उत्स्फूर्त गर्दी
Total Views: 27