बातम्या

राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत महिलांचा उस्फूर्त सहभाग

Spontaneous participation of women


By nisha patil - 11/29/2025 3:23:46 PM
Share This News:



राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत महिलांचा उस्फूर्त सहभाग

शहर आणि प्रभाग आठच्या धोरणात्मक विकासासाठी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी पॅनेलला मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. घरोघरी शासकीय योजना पोहोचवणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे आणि रखडलेली कामे मार्गावर आणण्यासाठी राष्ट्रवादीचा प्रचार जोरात असून, या प्रचारफेरीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग विशेषतः लक्षवेधी ठरत आहे.

प्रभाग आठमध्ये घर-टू-घर काढलेल्या प्रचारफेरीत उमेदवारांचे जोरदार स्वागत होत आहे. काही ठिकाणी औक्षण करून विजयाची खात्री देण्यात येत आहे. फेरीदरम्यान उमेदवारांनी केलेली विकासकामे, रखडलेले रस्ते, घरकुल योजनांचा वेग, बाग सुशोभीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, गटारींची उभारणी आणि नव्या वसाहतीतील पायाभूत सुविधा यावर सविस्तर माहिती देत मतदारांकडून आशीर्वाद घेतले.

भीमनगर येथून सुरू झालेली प्रचारफेरी भीमनगर कमान, संकेश्वर रोड, दुंडगा मार्ग, योद्धा ग्रुप परिसर, भोई वसाहती याठिकाणी फिरली. सर्वत्र उमेदवारांचे उत्साही स्वागत पाहायला मिळाले. या प्रचारात माजी नगरसेवक हारून सय्यद, माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, संतोष कांबळे, श्रीवास्तव म्हेत्री, संतोष सलवादे, पंकज संकपाळ, पृथ्वीराज बारामती, दीपक कांबळे, नामदेव बारामती, सुनील पकाले, शिवराज कोरे, राजू सलवादे, प्रवीण कांबळे, तेजस्विनी हुल्ले, सीमा कांबळे, सुजाता गुंठे, नीता लोंढे, प्रियांका सलवादे, सुरेखा चिनापगोळ, महादेवी आयवाळे, वैशाली कांबळे, गीता हुलसार, शीला चावडे आदींचा सहभाग होता.


वाढता पाठिंबा हीच विजयाची खात्री

शहरासह प्रभाग आठमध्ये मंत्री मुश्रीफ यांच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांना विविध सामाजिक मंडळी, सुज्ञ मतदार व संघटनांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांना व्यापक प्रतिसाद मिळत असून प्रभाग आठमध्ये विजय निश्चित असल्याची भावना उमेदवार महेश सलवादे आणि शबनम सय्यद यांनी व्यक्त केली.


राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरीत महिलांचा उस्फूर्त सहभाग
Total Views: 14