बातम्या
कागलमध्ये पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By nisha patil - 9/19/2026 7:59:05 PM
Share This News:
कागलमध्ये पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कागल : कागल नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील नागरिकांनी घरगुती गणपतींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले. पर्यावरणाचे संरक्षण आणि जलप्रदूषण टाळण्याच्या उद्देशाने नगरपालिका प्रशासनाने नागरिकांना पर्यावरणपूरक गणेश विसर्जन करण्याचे आवाहन केले होते.
या आवाहनाला नागरिकांनी सकारात्मक प्रतिसाद देत नगरपालिका प्रशासनाने केलेल्या पर्यावरणपूरक विसर्जन व्यवस्थेचा लाभ घेतला. गणेशमूर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करून नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
दरम्यान, पर्यावरणपूरक पद्धतीने गणपती विसर्जन करणाऱ्या नागरिकांना कागल नगरपालिका प्रशासनाकडून प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
परंपरा आणि श्रद्धा जपत पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी कागलकरांनी दिलेला हा प्रतिसाद कौतुकास्पद असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कागलमध्ये पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
|