बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील IIT-JAM व GATE परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यशाळा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
By nisha patil - 7/10/2025 5:12:02 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील IIT-JAM व GATE परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यशाळा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
कोल्हापूर दि. 7 : विवेकानंद महाविद्यालयात सर्व शास्त्र विभागाने आयोजित केलेल्या IIT-JAM आणि GATE या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस IIT मुंबईचे तज्ज्ञ रामानंद सिंग यादव आणि श्रीमती भूपिंदर कौर यांनी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय लठ्ठे यांनी केले. या वेळी वक्त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेची रचना, गुणांकन पद्धती, विषयानुसार तयारीचे नियोजन, तसेच वेळेचे व्यवस्थापन
या बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. त्यांनी यशस्वी उमेदवारांचे उदाहरण देत संकल्पनात्मक समज, सातत्यपूर्ण अभ्यास आणि सकारात्मक दृष्टीकोन यांचे महत्त्व स्पष्ट केले.
कार्यशाळेत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्यात आली. सत्रादरम्यान विद्यार्थी अत्यंत उत्साहाने सहभागी झाले. अनेक विद्यार्थ्यांनी या उपक्रमामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे आणि भविष्यात अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले.
प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. या कार्यशाळेच्या आयोजनात महाविद्यालातील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, कंप्यूटर सायन्स व इतर विभागातील शिक्षकवर्ग उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे आभार प्रा. डॉ. अर्जुन कुंभार यांनी मांडले.
विवेकानंद महाविद्यालयात राष्ट्रीय स्तरावरील IIT-JAM व GATE परीक्षेसाठी मार्गदर्शन कार्यशाळा : विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
|