बातम्या

प्रभाग नऊमधील कोपरा सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response from voters


By nisha patil - 11/29/2025 3:27:00 PM
Share This News:



प्रभाग नऊमधील कोपरा सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

आपल्या सुखदुःखात सहभागी होणारी, प्राथमिक सेवा–सुविधा देणारी माणसे अत्यंत मोजकी असतात. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेला कार्यकर्ता कुठेही कमी पडत नाही, असा इतिहास असल्याचे सांगत, “नेहमी तुमच्या सोबत उभे राहणाऱ्या उमेदवारांना विजयी करा,” असे आवाहन अमरीन मुश्रीफ यांनी केले.

प्रभाग नऊमध्ये नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरबतमठ, तसेच नगरसेवक पदाचे उमेदवार रामगोंड उर्फ गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार यांच्या प्रचारार्थ मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

त्यांनी पुढे सांगितले की,
गुंडू पाटील यांनी सामान्यांची कामे करण्याबरोबरच शासनाच्या योजना घराघरांत पोहोचण्यासाठी संघर्ष केला आहे. कोरोना व महापूराच्या संकटकाळात रस्त्यावर उतरून जनतेची सेवा करून त्यांनी प्रत्येकाच्या मनात विश्वास कमावला. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रभागातील रस्ते, गटारी, बगीचे सुशोभीकरण, स्मशानभूमी, विविध देवस्थानांची सभागृहे, समाजमंदिरे अशा अनेक कामांची पूर्तता केली.

यामुळे जनतेकडून मोठा आशीर्वाद मिळत असून आता त्यांच्या कामाची व्याप्ती वाढवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना साथ द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

उमेदवार रामगोंड उर्फ गुंडू पाटील म्हणाले,
मंत्री मुश्रीफ यांच्या पाठबळावर आम्ही सर्वांनी प्रभागात ठोस विकासकामे केली आहेत. आरोग्य मदत, आर्थिक मदत, संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून हातभार, तसेच शासकीय योजनांची अंमलबजावणी यामुळे प्रत्येक कुटुंबाशी आमचा स्नेहबंध तयार झाला आहे. त्यामुळे निवडणुकीत आम्हाला मिळणारा पाठिंबा अधिक बळकट होत असून विजय निश्चित आहे.

सभेसाठी महेश तुरबतमठ, दर्शना कुंभार, माजी नगरसेविका सावित्री पाटील, भारती कुंभार, निर्मला माने, रेणुका कोरी, इंदुबाई दड्डीकर, मीनाक्षी कोरी, शेवंता कदम, रेश्मा मोळदी, अशोक कुरबेट्टी, चंद्रकांत कुंभार, अनिल कुंभार, गोडसाखर संचालक शिवराज पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महिला मतदार उपस्थित होत्या.


विकासकामांची यादीच विजयाचे प्रवेशद्वार

मंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून प्रभागात पायाभूत सुविधा मजबूत झाल्या आहेत. शहरात सर्वाधिक शासकीय योजनांचे लाभार्थीही या प्रभागात असल्याने राष्ट्रवादी उमेदवारांना लोकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. केलेल्या विकासकामांची मजबूत यादीच विरोधकांपुढे कमी पडत असून, गुंडू पाटील आणि दर्शना कुंभार यांच्या विजयाचे प्रवेशद्वार ठरत असल्याचा विश्वास अमरीन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.


 


प्रभाग नऊमधील कोपरा सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 17