बातम्या

Tech-वारी विशेष प्रशिक्षण सत्रास जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response in Zilla Parishad Kolhapur for Tech


By nisha patil - 8/5/2025 12:42:37 PM
Share This News:



Tech-वारी विशेष प्रशिक्षण सत्रास जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर, दि. ५ मे २०२५ : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने दि. ०५ ते ०९ मे २०२५ या कालावधीत जिल्हा परिषद कोल्हापूर येथे “Tech-वारी” या विशेष ऑनलाईन प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान व प्रशासनिक कौशल्य विकसित करण्यासाठी हे सत्र अत्यंत उपयुक्त ठरले.

Tech-वारी सत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, IoT, सायबर सुरक्षा, तसेच तणाव व्यवस्थापन व ध्यानधारणा यासारख्या विषयांवर तज्ज्ञांचे व्याख्याने झाली. पहिल्या दिवशी मा. श्री. प्रभु गौर गोपालदास, श्रीमती देबजानी घोष (नीती आयोग), श्री. मंदार कुलकर्णी व श्री. अभिषेक सिंग (एआय इंडिया मिशन) यांची सत्रे विशेष आकर्षण ठरली.

सदर ऑनलाईन सत्र जिल्हा परिषदेच्या ४थ्या मजल्यावरील सभागृहात घेण्यात आले असून सर्व विभाग व पंचायत समितीतील कर्मचारी सहभागी झाले. कार्यक्रमाची सुरुवात उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनिषा देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.

सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत ६ ते ९ मे दरम्यानचे उर्वरित सत्रे सुरू राहणार असून, सर्व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Tech-वारी विशेष प्रशिक्षण सत्रास जिल्हा परिषद कोल्हापूरमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 106