बातम्या

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

Spontaneous response to Gudhi Padwa


By nisha patil - 8/5/2025 12:32:05 PM
Share This News:



कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर,  : चैत्र शुद्ध प्रतिपदा, म्हणजेच गुढी पाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस असून, कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यासाठी साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून पवित्र मानला जातो. या अध्यात्मिक पार्श्वभूमीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी करत, कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो.

या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांमार्फत गुढी पाडव्याच्या दिवशीच दाखलपात्र विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना शाळेत आमंत्रित करण्यात येते. विद्यार्थ्यांचे यथोचित स्वागत करून त्यांचे प्रवेश अर्ज भरून घेतले जातात व प्रवेश निश्चित केला जातो.

यंदाही या उपक्रमाला जिल्हाभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ६ वर्षे पूर्ण झालेल्या दाखलपात्र २६,१८२ बालकांपैकी १५,७३७ बालकांनी (सुमारे ६०.११%) गुढी पाडव्याच्या दिवशीच जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश घेतला. काही शाळांमध्ये तर पालकांची गर्दी एवढी होती की प्रवेशासाठी रांगा लागलेल्या दिसल्या.

प्रमुख शाळांमध्ये उस्फूर्त प्रतिसाद
वि.मं. कणेरीवाडी, वि.मं. हसूर दुमाला, वि.मं. कुरुंदवाड नं. ३, वि.मं. खिद्रापूर, वि.मं. म्हाकवे, वि.मं. सोनाळी, वि.मं. बोरवडे, वि.मं. शिनोळी, उर्दू वि.मं. चंदगड, केंद्रशाळा कोलोली, वि.मं. जाखले, वि.मं. खानापूर आदी शाळांमध्ये पालकांचा चांगला प्रतिसाद दिसून आला.

तालुकानिहाय प्रवेश तपशील:

अ.क्र. तालुका दाखलपात्र संख्या गुढीपाडव्यादिवशी प्रवेश टक्केवारी
आजरा ६९९ ५७७ ८२.५५%
भुदरगड ११५३ ८३७ ७२.५९%
चंदगड १६१२ १२३१ ७६.३६%
गडहिंग्लज १४५६ ८७३ ५९.९६%
गगनबावडा ३९६ ३५८ ९०.४०%
हातकणंगले ४७८४ १८१५ ३७.८६%
कागल २३४४ १५१८ ६४.७६%
करवीर ४७९३ २५१२ ५२.४१%
पन्हाळा २४२३ १५६३ ६४.५१%
१० राधानगरी १७७० १३९३ ७८.७०%
११ शाहुवाडी -- -- ८१.५५%*
१२ शिरोळ ३३५६ १८९३ ५७.०९%
  एकूण २६१८२ १५७३७ ६०.११%

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'गुढी पाडवा - शाळा प्रवेश वाढवा' उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद
Total Views: 194